अपराधताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

मानवत येथील ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात;

🌐 [प्लॉटच्या फेरफारसाठी केली होती ११ हजार रूपयाची मागणी]🌐

✍️प्रविण घागरे मानवत / प्रतिनिधी

मानवत येथील ग्राम महसूल अधिकारी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

११ हजार रुपयाची मागणी करणारा ग्राम महसूल अधिकारी लाच लुचपत प्रतिबंध विभाग पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. १२ मार्च रोजी या बाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदाराच्या सासऱ्याऱ्यांनी मानवत शहरातील आदर्श नगर भागात प्लॉट खरेदी केला होता.

२० फेब्रुवारी रोजी तक्रारदार यानी त्यांचे सासऱ्याचे प्लॉटचे फेरफार करून सातबारा मध्ये नोंद घेण्यासाठी प्लॉट खरेदी दस्ताची संचिका ग्राममहसूल अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना दिली होती दस्त नोंदणी केल्या नंतर फेरफारसाठी खूप उशीर केला त्यामुळे ११ हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी लाचेची मागणी केली ०३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागा कडे तक्रार करण्यात आली.

उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे दुसरी आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन..!

तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, विठ्ठल पंढरी नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे ११ हजार रुपया च्या लाचेची मागणी पंचासमक्ष करून तडजोडी अंती १० हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली त्यानंतर १२ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचत विठ्ठल पांढरी नागरगोजे यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्विकारली नाही मात्र लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले.

यावेळी पथकाने अंग झडती केली असता विठ्ठल नागरगोजे याच्याकडे रोख १० हजार २०० रुपये तर टेबलच्या ड्रॉवरमध्ये रोख ०२ लाख ४५० रुपये आढळले त्यावरुन विठ्ठल पांढरी नागरगोजे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.

सदरील कारवाईत लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी, निल पत्रेवार, पोह रवींद्र भूमकर, सीमा चाटे, पो. अंमलदार अतुल कदम, कल्याण नागरगोजे, शान बोधनकर, राम घुले चापोह जे. जे. कदम, नरवाडे यांच्या सह पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!