कृषी धनताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतविशेषसामाजिक

शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्या संदर्भात चक्काजाम आंदोलनास प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा मानवतमध्ये जाहीर पाठिंबा..!

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक 22 जुलै) शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय हक्काचा मागण्या संदर्भात मा. आ. बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २४ जुलै गुरुवार रोजी राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनास पाठिंबा मानवत येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा वतीने जाहीर करण्यात आला असून संघटनेचा वतीने न्याय हक्काचा मागण्या साठी २३ जुलै रोजी मानवत येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून यावेळी मागण्याचे निवेदन प्रसासनास सादर करण्यात आले आहे.

यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे मानवत तालुकाध्यक्ष रवि बालटकर, मारोती शिंदे महेंद्र गाढे, प्रभाकर गिराम, तुकाराम चव्हाण, यांच्या सह शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!