कृषी धनताज्या बातम्यापरभणीमानवतसामाजिक

मानवत येथे महाराष्ट्र राज्य शेमजूर युनियन (लाल बावटा) आयोजित शेतमजूर महिला परिषद संपन्न

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक 28 मार्च)शहरातील जिजाऊ सभागृहात २४ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य शेमजूर युनियन ( लाल बावटा ) च्या वतीने शेतमजूर महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ. इंदुमती महाडिक या होत्या तर प्रमुख उपस्थित म्हणून केंद्रीय कार्यकारी सदस्या कॉ. सरिता खंदारे यांची उपस्थिती होती केंद्रिय कमिटी सदस्या कॉ. सरिता खंदारे – शर्मा यांनी महिला परिषदेचे उदघाट्न केले.

तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॉ. रामकृष्ण शेरे पाटील यांनी केले. कॉ. दत्ता डाके, कॉम्रेड स. रज्जाक यांनी उपस्थितां मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक बुरखुडे यांनी केले.

समान कामास, समान वेतन विधवा, परितक्त्या, निराधार, वृद्ध, यांना विना अट दरमहा 6 हजार रुपये अनुदान द्या. घरकुला साठी केरळ राज्य सरकार प्रमाणे सात लाख रुपये द्या, जन विरोधी जन सुरक्षा प्रस्तावित विधयक मागे घ्या, जात आणि धर्माच्या नावावर दंगली पेटवणाऱ्यांना धडा शिकवा, इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.

आभार कॉ. लिंबाजी धनले यांनी मानले यावेळी जिल्हा श्रमिक महिला कमिटीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी कॉ इंदुमती महाडिक आणि सचिवपदी रुक्मिण शिंदे तर सदस्य म्हणून कॉ. लताबाई औताडे, कॉ. सरुबाई टरफले,

कॉ. शांताबाई बुरखुंडे, कॉ. प्रभावतीबाई कांबळे, कॉ. हरिबाई कामिटे, संगीता भदर्गे, कॉ. शामल जाधव यांची निवड करण्यात आली परिषद यशस्वी करण्यासाठी अलकाबाई मगर, शोभाबाई कांबळे, चंद्रकलाबाई ढगे, रुक्मिणीबाई धानोरे, धोंडाबाई साळवे, राजामती बुरखुंडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास तालुक्या तील मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!