जिनियस किडझ स्कूल माहूर चा MESTA तर्फे उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान!

तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे
मुंबई:- दि.21/04/2025 रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह महानगरपालिका ठाणे येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल माहूर’ ला 2024-25 या वर्षाचा MESTA तर्फे उत्कृष्ट शाळा (Best School Award) मेस्टा राज्यस्तरीय पुरस्कार या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, (सदस्य विधान परिषद ), मा. निरंजन डावखरे(सदस्य विधान परिषद),मा.संजय केळकर(शिक्षक आमदार ठाणे) मा. संजय तायडे पाटील( संस्थापक अध्यक्ष मेस्टा ) मा. शेषराव पाटील सर ( शिक्षक परिषद माहूर तालुका अध्यक्ष) आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार मिळण्यासाठी ऑनलाईन शाळेची माहिती व वर्षभरात केलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी चे फोटो अपलोड करण्यात आले होते. यामध्ये पाच मुट्टी अनाज उपक्रम, आजी आजोबांचा पालक मेळावा, 15 ऑगस्ट ची रॅली, जीनियस गॅदरिंग व शाळेचा रिझल्ट अशा बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहे.


हा पुरस्कार मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत, सोबत शिक्षकांनी घेतलेली मेहनत, सर्व पालकांनी वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर चे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे. म्हणूनच कमी कालावधीतच ही शाळा नावारुपाला आली आहे.
