मानवत येथील मलिकार्जुन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रक्कम केली लंपास
✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)

मानवत येथील राष्ट्रीय महामार्ग 61 लगत असलेल्या उड्डाणपूल जवळील मलिकार्जुन मंदिरातील दानपेटी रविवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.


येथील मलीका अर्जुन मंदिरातील दानपेटी रविवारी सकाळी दोन ते तीनच्या वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम लंपास केली .

या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग 61 लगत असलेल्या गोलाईत नगर मधील थळकरी सर मलकार्जुन मंदिरात सकाळी तीन वाजता आले असताना त्यांच्या नजरेत दानपेटी फोडल्याचे दिसून आले .

सकाळी 5 च्या सुमारास पत्रकार के. डी. वर्मा व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मुंजाभाऊ तरटे व शिक्षक थळकरी यांनी मलीकार्जुन मंदिर लगत असलेल्या अॅड. बारहाते यांना उठवून घटनेबाबत माहिती दिली गेल्या आठवड्यात मलकार्जून मंदिर परिसरात शिवकथेचे आयोजन शिवरात्री निमित्त करण्यात आले होते.

या या कथेच्या दरम्यान शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दानपेटीत टाकले गेल्यावर्षीही शिवरात्री निमित्त शिवकथेचे आयोजन करण्यात आले होते. शिवकथा संपल्यानंतर आठ ते दहा दिवसात दानपेटी फोडण्यात आली होती.

याही वर्षी चोरट्यांनी संधीचा लाभ घेऊन मलिकार्जून मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रक्कम ल़पास केली.
