साहेब आता तरी आम्हाला स्मशानभूमी द्या म्हणत…! दहागाव येथील महिलांनी दिले ठिक ठिकाणी निवेदन

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
उमरखेड : - दहागाव येथील महिलांनी एकत्र येऊन अनेक वर्षापासूनच्या संघर्षाला रुळावर आणत "साहेब आता तरी आम्हाला स्मशान भूमी द्या.."

म्हणत तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व लोकप्रतिनिधींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ठराव घेऊन आम्हाला स्मशान भूमी द्यावी अशी मागणी गावातील महिलांच्या माध्यमातून करण्यात आली. कुठल्याही गावामध्ये जा तिथे नदी किंवा ओढ्याच्याकडेला एकतरी स्माशनभूमी असतेच.

राज्यात अनेक गावं अशी आहेत जिथे अद्याप पाण्याची किंवा वीजेची सोय पोहचलेली नाही पण तिथे स्मशानभूमी मात्र आहे. कारण माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव जिथे स्मशानभूमीच नाही. दहागाव असं या नावाचं गाव असून, सुरुवातीपासूनच या गावात स्मशानभूमी नाही. त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास नाल्याच्या किनारी उघड्यावरच त्याचे अंतिम संस्कार केले जातात.

गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी हीच परिस्थीती आहे. असं म्हणतात की, एकाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असले, तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा. मात्र, अद्यापही त्यांना स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही ही शोकांतिका काही महिलांनी समोर मांडली .
आत्तापर्यंत गावातील नागरिक हे नाल्याच्या ठिकाणी असलेल्या पांदन रस्त्यावर अंत्यविधी करत होते परंतु ते अंत्यविधी करत असताना पाऊस आला तर गुडघ्या इतक्या चिखलातून जाव लागत. पावसाने जोर धरला तर बॉडी अर्धवट जळून पुराच्या पाण्यात हाडके वाहत जातात अशी परिस्थित पावसाळ्यात निर्माण होते. त्यामुळे दहागाव वासियांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवासही काहीसा कठीण असल्याचंच म्हणावं लागेल.

दरम्यान, स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शासनाकडे वेळोवेळी या समस्येबाबत लेखी निवेदन देऊन स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी केली आहे. मात्र, आजपर्यंत दहागाव स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही. देशात लोकशाही येऊन इतकी वर्ष झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारांसाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नाही, अशा शब्दांत येथील ग्रामस्थ महिलांनी आपला संताप व्यक्त केला.

गावात स्मशानभूम हवी असल्यास आता लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण निवेदने देऊ असे म्हणत आमदार किसनराव वानखेडे यांना निवेदन देण्याचं ठरले परंतु ते अधिवेशन असल्या कारणाने उपस्थित नसल्या मुळे गरिबांचे कैवारी व जनतेचे पुढारी असणारे भाजप यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या घरी जाऊन महिलांनी निवेदन दिले.

चौकट: –संपूर्ण जिल्ह्यात जनतेचे लाडके भाऊ म्हणून ओळख असणारे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या घरी गेले असता असे समजले की, ते ही मुंबई या ठिकाणी गेले आहेत त्यामुळे महिलांनी तिथून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. परंतु घरातून त्यांच्या पत्नीने आवाज देत सर्व महिलाना थांबवले.
जिल्हा समन्वयकाची पत्नी असण्याचा कुठलाही अभिमान न बाळगता प्रेमळ व हसरा स्वभाव असणाऱ्या ताईंनी सर्व महिलांच्या बरोबरी ने पायरी वरती बसून त्यांच्या सोबत अगदी हसत खेळत बोलून सर्व महिलांचे मन जिंकून घेतले व महिला करत असलेल्या कार्याचा आदर करत सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केली. साहेबांना तुम्ही करत असलेली स्मशान भूमी ची मागणी मी नक्की सांगेल आणि तुम्हाला तुमच्या हक्काची स्मशानभूमी मिळून देण्यासाठी तुम्ही करत असलेल्या कार्यात आम्ही नक्कीच सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.
