किनवट येथून टेंबुरदरा गावाजवळील घाटात एस टी बसला अपघात
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍️ समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
किनवट:- उमरखेड बस क्रमांक एम एच 20 बि एल 0694 ब्रेक फेल होऊन उमरखेड तालुक्यातील टेंबुरदरा गावा जवळील घाटात महामंडळ पलटी झाली.

सुदैवाने जिवितहानी झाली नाही. चालक सुनिल तारमेकवाड किरकोळ जखमी झाले. व वाहक सौ.ढोले मॅडम गंभीर जखमी झाल्या आहेत. ब्रेक डाऊन टिम ने बस च्या ब्रेकचे काम केल्यानंतर अवघ्या दोन किलोमीटर वर बस गेल्यावर सदरील घटना घडली.

प्रवाशी ईतर वाहनाने मार्गस्थ झाल्यामुळे बस मध्ये प्रवाशी कोणी नव्हते. किनवट व माहूर आगारात 80 टक्कै बसेस भंगार अवस्थेत आहेत. या भंगार व नादुरुस्त बसेस मुळे प्रवाशी व कर्मचाऱ्यांच्या जिवीतेला धोका आहे.

महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन किनवट व माहूर व स्थानकामध्ये नवीन बसेस उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

या घडलेल्या प्रकरणाकडे गांभीर्याने बघून. माहूर व किनवट या डेपोला नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
