ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशहरशैक्षणिक

के. के. एम. महाविद्यालयात दिक्षांत समारंभाचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी प्रविण घागरे

मानवत येथील के.के. महाविद्यालयात २८ जून रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या दिशांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून श्री. विजयकुमार कत्रुवार पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन हे दीक्षांत पर मार्गदर्शन करणार आहेत .

मा. प्राचार्य डॉ. दिलीप गरुड आदर्श महाविद्यालय उमरगा संस्थेचे सचिव मा. श्री. बाल कीशनजी चांडक, कोषाध्यक्ष मा. रामचंद्रराव कत्रुवार, उपाध्यक्ष मा. श्री अनिल नखाते, सहसचिव मा. श्री. विजयकुमार दलाल व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी के. के. महाविद्यालया तून पदवी प्राप्त केलेली असेल अशा विद्यार्थ्यांनी २८ जून शनिवार रोजी दुपारी १: वाजता महाविद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन के. के. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!