संतोषअण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ आज उमरखेड तालुका बंदचे आवाहन
✍️बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख क्रूर हत्याकांड झाले असून या क्रूर हत्याकांडाच्या करण्याच्या निषेधार्थ दिनांक ६ मार्च २०२५ रोजी उमरखेड तालुका बंद ठेवण्याचे आवाहन बाबत सकल मराठा समाज उमरखेड चे वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना आज रोजी निवेदन देण्यात आले.

सकल मराठा समाज उमरखेडचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे क्रूर हत्याकांड झाले असून सदरील घटना अतिशय संवेदनशील व मानवतेला काळिमा फासणारी असून सुद्धा त्यामध्ये हवा त्या प्रमाणात तपास होत नसल्याचे जाणवत आहे

तसेच या हत्याकांडामध्ये काही मोठे राजकारणी असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य तो तपास होत नाही असे निदर्शनात येत असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा व धनंजय मुंडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील या प्रकरणांमध्ये सह आरोपी करण्यात यावे,


या मागणीसाठी सकल मराठा समाज उमरखेड तालुक्याच्या वतीने या क्रूर हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक ६ मार्च २०२५ गुरुवार रोजी उमरखेड तालुका व शहर एक दिवसीय बंद ठेवण्याचे आवाहन विनंती सुद्धा करण्यात आली आहे.

सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
