Uncategorized

जिल्हा शिक्षणाधिकारी मा. सुनील भोपळे व गटशिक्षणाधिकारी मा. सुरेखा तांबट यांच्या हस्ते पत्रकार विश्वास गायकवाड यांचा सन्मान बोरघर

जिल्हा शिक्षणाधिकारी मा. सुनील भोपळे व गटशिक्षणाधिकारी मा. सुरेखा तांबट यांच्या हस्ते पत्रकार विश्वास गायकवाड यांचा सन्मान बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘घर घर संविधान’ साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचा जागर राज्यातील प्रत्येक जिल्हा निहाय जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत सर्व तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आला.

शासनाच्या या संविधान गौरव राष्ट्रीय उपक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी माणगांव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी मा. सुरेखा तांबट मॅडम यांच्या कार्य कुशल नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, तंत्र स्नेही, साधन व्यक्ती, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शाळांमधून करण्यात आली आहे.

Oplus_131072

शासनाच्या सदर राष्ट्रीय विधायक कार्यात सहभाग घेवून हे अभियान यशस्वी करणार्या प्रशासकीय अधिकारी, केंद्र प्रमुख, तंत्र स्नेही, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि सदर उपक्रमाची दखल घेऊन हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या लेखणीच्या माध्यमातून पोहचवणार्या पत्रकारांचा सत्कार कार्यक्रमात गोरेगांव येथील ना. म. जोशी महाविद्यालयात आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील बोरघर गावचे सुपुत्र निर्भीड पत्रकार विश्वास गायकवाड यांचा सत्कार रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी मा. भोपळे साहेब आणि माणगांव तालुका गटशिक्षणाधिकारी मा. सुरेखा तांबट मॅडम यांच्या हस्ते सन्मानपूर्वक यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आलआहे.

सदर कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी मा सुनील भोपळे साहेब, माणगांव च्या कार्य कुशल गटशिक्षणाधिकारी मा सुरेखा तांबट मॅडम, चारिझेन फाऊंडेशन पदाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, तंत्र स्नेही, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, विद्यार्थी दैनिक रायगड स्वाभिमानचे संपादक मा. रघुनाथ कडू साहेब उपस्थित होते. शासनाच्या ‘घर घर संविधान’ या प्रेरणादायी राष्ट्रीय उपक्रमाची यशस्वी यशोगाथा अहवाल पुस्तिका आणि चलचित्रपट माणगांव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला या मध्ये माणगांव तालुका शिक्षण विभागाने आवर्जून पत्रकार विश्वास गायकवाड यांच्या शासनाच्या सदर उपक्रमाला सर्वदूर प्रसारित करणार्या राष्ट्रव्यापी बातम्यांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे.

हा त्यांच्या निस्पृह आणि निर्मोही लेखणीचा आणि पत्रकारितेचा गौरव आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!