उमरखेडमहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक पेशाला काळिंबा फासणाऱ्या शिक्षकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

(यवतमाळचे शिक्षण अधिकारी मिश्रा यांनी दिले निलंबनचे आदेश)

✒️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

✒️ सिद्धार्थ दिवेकर (सहसंपादक रिपोर्टर) मो.9823995466

✍️करण भरणे सर (ढाणकी सर्कल प्रतिनिधी)

उमरखेड (दिनांक 27 नोव्हेंबर) बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांना महिनाभरात त्यांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असताना सुद्धा आज ही काही शाळेत महाराष्ट्र सरकारचे आदेश पाळतानी खेड्या गावातील शाळेतील समिती व अधिकारी दिसत नाही.

म्हणूनच आज उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे शिक्षक पेशाला काळिंबा फासल्याची घटना घडली असून येथील शाळेतील शिक्षक शेख जमीर शेख नजीर या शिक्षकाने त्यांच्या शाळेतील 6 व्या वर्गातील विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केला असून त्याच्यावर बिटरगाव पोलीस ठाण्यात 75(1) भारतीय न्याय सहिता सह कलम 8,12पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी शिक्षक फरार असून बिटरगाव पोलीस ठाण्याचे एपीआय मनवर साहेब त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणाची गंभीरता बगुन यवतमाळचे शिक्षण अधिकारी यांनी पंचा सोबत चौकशी केली असता त्यांना त्या शिक्षकाने एका मुलीचा विनयभंग न करता चार मुली सोबत त्यांनी हे कृत्य केल्याचे कळाले असता पालकांनी त्या शिक्षकांवार कठोर कार्यवाही करत त्याची सेवा समाप्त निलंबन करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

चौकट :- मी ढाणकी येथील उर्दू शाळेत विद्यार्थ्यांनी सोबत झालेल्या विनयभंग प्रकरणाच्या चौकशी साठी आलो असता मला या प्रकरणात तथ्य आढळून आल्यामुळे या शिक्षकावर प्रशासनद्वारे निलंबन करण्याची कार्यवाही करण्यात येईल. – प्रकाश मिश्रा (E.O शिक्षण अधिकारी यवतमाळ)

कोणत्याही जाहिरात कमी दरामध्ये स्वीकारण्यात येतील

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!