ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

लिफ्ट आणि स्काय वाकचे काम जलद गतीने पूर्ण करा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी समाधान कांबळे

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिनांक 26 रोजी माहूर येथे भेट देऊन माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे सुरू असलेल्या लिफ्ट आणि लिफ्ट आणि स्काय वाकच्या कामास भेट देऊन कंत्राटदारांनी काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सक्त सुचना देत श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव यांचे सह अधिकारी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे सह मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर दौऱ्यात माहूर गडावरील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या टुरिस्ट फॅसिलिटी सेंटर येथे भेट देऊन सर्वप्रथम पाहणी केली तसेच येथे भाविकांना सुविधा सोयी सुरक्षा बाबत माहिती घेत येथे पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या जागेची सुद्धा पाहणी केली.

यानंतर त्यांनी गडावरील सुरू असलेल्या लिफ्ट आणि स्काय वाकच्या कामांची पाहणी करत येथील कंत्राटदार व अधिकाऱ्यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याची सक्त सूचना केल्या यानंतर त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली .

यावेळी विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे कडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व विश्वस्त पुजारी कर्मचारी सुरक्षा रक्षक उपस्थित होतेदर्शनानंतर विश्रामगृह येथे लिफ्ट आणि स्कायबागच्या कामाच्या कामात उठवले जाणारे व्यापारी आणि जिल्हाधिकारी यांच्या समन्वय बैठक झाली.

यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे तहसीलदार किशोर यादव वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे नायब तहसीलदार डॉ .राजकुमार राठोड सहाय्यक अभियंता रवींद्र उमाळे सहाय्यक अभियंता आकाश राठोड प्रोजेक्ट मॅनेजर विडेकर आणि माने यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!