ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

मानवत येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २३ फेब्रुवारी ) चर्मकार समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे महामेरू संत श्री रविदास महाराज यांची जयंती मानवत येथे २३ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

मानवत येथील नव्या दत्त मंदिर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.

यावेळी मानवत शहरातील व परिसरातील सर्व चर्मकार बांधव महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभा यात्रेमध्ये बाल वारकऱ्यांनी सहभाग घेऊन टाळ मृदंगाच्या सुरात भव्य शोभायात्रेची शोभा वाढवली होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!