आरोग्यउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

गावंडे महाविद्यालय रा.से.यो. मार्फत आरोग्य जनजागृती

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड:- येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दत्तक ग्राम मरसूळ, उमरखेड येथे आयोजित केले आहे.

दुपारच्या बौद्धिक क्षेत्रात मोफत दंत चिकित्सा त्या सोबतच विद्यार्थिनीं साठी आरोग्या विषयक व स्त्रियांच्या समस्या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रार्थमिक आरोग्य केंद्रातून डॉ. ज्योती जाधव बी.डी.एस व त्यांच्या सोबत कुमारी साक्षी व कुमारी दीक्षा बी.डी.एस या होत्या. कुटीर रुग्णालय उमरखेड येथील आर. आर. सी. क्लबच्या सौ. वैशाली घोंगडे मॅडम (आय.सी.टी.सी कौन्सेलर, उमरखेड) यांनी एच. आई. व्हि., एडस् अवेअरनेस बद्दल माहिती दिली.

प्रा. प्रवीण नखाते सर यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल व स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले, बंटी भाऊ रूढे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन वैभव वाघ, आरती चंद्रवंशी राष्ट्रीय, वैष्णवी गायकवाड, सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी कार्यक्रमात भरभरून सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून सर्व कार्यक्रमांची आखणी केल्या गेली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, अर्चना मीटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!