अपराधउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

उमरखेड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या इसमांना एक वर्षाकरीता चार जिल्ह्याचे स्थळसिमेतुन तडीपार

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 19 एप्रिल) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत जाब देणार इसम नामे 1. शेख गौस शेख करीम, वय-21 वर्ष, रा. नागापुर रुपाळा उमरखेड जि. यवतमाळ 2) शेख अजहर उर्फ शुट शेख अकबर वय-25 वर्ष, रा.अब्दुल रहेमान कॉलणी उमरखेड जि. यवतमाळ 3) रितेश महेंद्र तिवारी, वय-22 वर्ष, रा.विडुळ ता.उमरखेड जि. यवतमाळ हा चोरी करणे, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, दुकान जाळुन नुकसान करणे, तसेच जातीय तेढ निर्माण होईल,

अशा प्रकारचे गुन्हे केले वरुन त्याचे वर वेळो वेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याचे वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेड तडीपार प्रस्ताव क्र 05/2024, 02/2024 व 03/2024 कलम 56 (1) (अ) म पो का अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे कडे सदर इसमाचा तडीपार प्रस्ताव पाठविला होता.

दि.02/04/2025 रोजी मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, उमरखेड यांनी सदर इसमांना एक (1) वर्षाकरीता यवतमाळ व जिल्ह्यालगतच्या नांदेड, वाशिम, हिंगोली या 03 जिल्याचे स्थळसिमेतुन हद्दीतुन तडीपार केले.

बाबतचा आदेश काढल्यावरुन सदर इसमास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 टेंभरे यांनी सदर इसमास बाहेर जिल्ह्यात सोडण्याकरीता ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक डॉ. श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग शिंदे, पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोशि/1652 टेंभरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!