ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमाहुर श्रीक्षेत्र

माहूर तालुक्यातील माता रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजना चे लाभार्थी रेती पासून वंचित

माहूर (प्रतिनिधी) समाधान कांबळे

माहूर (दिनांक 6 एप्रिल) तालुक्यातील मौजे टाकळी येथे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने दिवस-रात्र पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे व टाकळी परिसरात शेकडो ब्रास अवैध रेती साठा उपलब्ध आहे. हीच परिस्थिती लांजी, नेर, चोलेवाडी, पडसा, हडसनी, हिंगणी, दिगडी व साकुर येथे सुद्धा पहावयास मिळेल.

पैनगंगा नदीपात्रातून अवैध उत्खनन करणे,महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यां मार्फत जप्ती करणे व त्याच रेती चोरांमार्फत त्या जप्तीच्या पावत्या मिळवणे आणि त्या पावत्याच्या आधारे 50 ब्रास रेतीच्या पावत्या असतील तर त्यावर 500 ब्रास रेती ही पैनगंगा नदीपात्रातून चोरल्या जाते हे सगळं महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याशिवाय होणे शक्य नाही.

माहूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असे गाव गुंड व रेती चोर नेर, चोलेवाडी टाकळी, जुनी व नवीन, वडसा पेंड, पडसा नागोबा, सायफळ, दिगडी, साकुर व इतरत्र असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रेती चोर पहावयास मिळत आहेत.

तालुक्यात सर्वत्र या रेती चोरट्यांनी दहशत पसरवली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 3 व 4 एप्रिल 2025 पासून युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका संपूर्ण टीम प्रत्येक रेती घाटावर तलाठी गावंडे यांना सोबत घेऊन नेर रेती घाट, चोलेवाडी रेती घाट, टाकळी रेतीघाट, वडसा रेतीघाट, नागडोह रेतीघाट, व सायफळ रेतीघाट. या प्रत्येक रेती घाटाच्या ठिकाणी खड्डे करून सुद्धा अवैध रेती उत्खनन रात्रभर सुरू होते,

विशेष बाब म्हणजे चोलेवाडी येथे दीडशे ते दोनशे ब्रास एवढा रेतीसाठा उपलब्ध आहे जे की प्रशासनाने दिलेल्या साठ्याच्या चौपट असा आहे. व त्यानंतर टाकळी येथील स्मशानभूमी येथील साठा 80 ते 90 ब्रास एवढा तिथे उपलब्ध आहे. तसेच चोलेवाडी येथील 300 ते 400 ब्रास रेती तिथे उपलब्ध सध्याच्या स्थितीत उपलब्ध आहे.

नेर येथील तलाठी चंद्रकांत बाबर व टाकळी येथील तलाठी गावंडे व तसेच मंडळ अधिकारी सिताराम सालसुंदर व माहूर येथील नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांना दूरध्वनी द्वारे कळविले असता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रत्येक रेती घाटावर गेल्यानंतर तिथे जाहीर केल्यापेक्षा दहापट रेती रेती उपलब्ध असल्यामुळे त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता ते उडवा उडवी चे उत्तर देत होते.

व त्यांना तहसील कार्यालयासमोर बाईट देण्याकरिता संपर्क साधले असता दोन ते तीन तास वाट पाहून सुद्धा तिथे स्वतः व मंडळ अधिकारी व तलाठी कोणीही तिथे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आता गोरगरिब घरकुलधारकांना माफक दरात रेती मिळेल का हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!