आईची जागा कोणी ही घेऊ शकत नाही – कवी आत्माराम कुटे
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- ( दिनांक २८ फेब्रुवारी )मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ग्रामीण कवी श्री आत्माराम (बापू ) कुटे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी आई, शेतकरी, सैनिक, विद्यार्थी, संस्कार मानवता वादी विचारसरणी, अशा विविध विषया वरती विद्यार्थ्या समोर आपल्या विचारातून कविता सादर केल्या यावेळी दर्जेदार कविता सादर करताना विद्यार्थ्याकडून देखील भर भरून असा प्रतिसाद त्यांना मिळाला मान्यवरांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या विविध कविता संग्रह भित्तिपत्रका मार्फत नववीच्या विद्यार्थिनींनी बनवले होते.
त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. विश्वभूषण इंगोले हे उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. मनीषा आहेरकर यांनी केले आणि आभार श्री. ज्ञानेश्वर पांचाळ यांनी मानले यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त उत्कृष्ट भाषण केल्या बद्दल शाळेतील विद्यार्थीनी अनन्या संतोष बारहाते या विद्यार्थिनीचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..
