ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे एन. एम. एम. एस परीक्षेत घवघीत यश

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत / प्रतिनिधी ) मो. 8308755238

मानवत:- नुकताच एन. एम. एम. एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मानवत तालुक्यातील मौ. ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेतील या परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. कल्याणी गुंगाणे, कु. आरती पठाडे, चि. श्रीनाथ भोकरे या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक, श्री. श्रीपाद माटेगावकर व श्री. दत्तात्रय जोजारे यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमरखान पठाण, ताडबोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच माऊली काजळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सावळे आणि उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जूनेद खान यांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील तज्ञ शिक्षक श्री. बलभीम माथेले तर आभार श्री. आदिल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उमरखान पठाण, सरपंच श्री. माऊली काजळे, श्री. दिगंबर पठाडे, श्री. यकीनखान पठाण, श्री. बापुराव जंगले, श्री. गुलाबराव चिंचाणे, हाफीज इरफान खान यांच्या सह विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!