ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

मानवत येथे शिव प्रताप ग्रंथ पारायणाचे आयोजन

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त उपक्रम

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- ( दिनांक १८ फेब्रुवारी) राज्यात सर्वत्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथाचे पारायण केले जाते आणि महापुरुषांची जयंती असेल तर मिरवणूक काढली जाते मात्र मानवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिव प्रताप ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात येत आहे .

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर ग्रंथ वाचनास प्रारंभ झाला असून १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी या सोहळ्याचा समारोप होणार आहे. गाथा पारायणाचे नेतृत्व ज्ञानेश वारकरी गुरुकुलाचे ह. भ. प. पंडित महाराज डाके हे करत आहेत. यावेळी ज्ञानेश वारकरी गुरुकुलाचे विद्यार्थी, शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी असल्याने राज्यातील प्रत्येक घरा घरात शिवचरित्र पोहोचले पाहिजे समाजातील सर्व युवक, विद्यार्थी, महिला यांनी शिवचरित्राचा अभ्यास करणे आवश्यक असल्याने या पारायण सोहळ्यास जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित रहावे…!

असे आवाहन मानवत येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे उपध्यक्ष शिवश्री. गोटू भरकड यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!