उमरखेड तालुक्यातील पोफळी कारखाना आणि गौळ बाजार येथे अवैध जुगार, वरळी मटका खुलेआम सुरू
(💥दिवाळी सणाच्या अगोदर त्वरित बंद करण्याची नागरिकांनी मागणी)

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक)
उमरखेड (दिनांक 17 ऑक्टोंबर) तालुक्यातील पोफळी कारखाना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौळ बाजार येथे अनेक दिवसांपासून खुल्या जुगार व वरळी मटका जोरात सुरू केला आहे.गौळ बाजार येथे शाळेच्या प्रांगणाच्या समोर मटका काउंटर असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

गौळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याने अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त होत आहेत.तसेच पोफाळी पोलीस स्टेशन, समोरच वरळी काउंटर सुरू आहे. या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाने डोळे झाक करून यावर पडदा टाकण्याचे काम पोलीस प्रशासन केले जात आहे का? अशी चर्चा सुरू आहे.

गौळ बाजार व पोफळी कारखाना येथील अवैध मटका जुगार हे दिवाळी सणाच्या अगोदर तत्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी पोफळी पोलिस स्टेशन परिसरातील नागरिकांनी केली आहे.
