अपराधउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

वाहनावरचा ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात; चालक ठार तर एक गंभीर जखमी

✍🏻 करण भरणे सर (ढाणकी/ बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी (दिनांक 10 फेब्रुवारी) जवळील महागाव फाट्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या अपघातात होऊन शिवराज देशमुख चालकाचा मृत्यू झाला आहे तर माधव गंगाराम जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

स्विफ्ट डिजार या गाडी (क्रमांक ए.एम. 02/सी. आर. 4211 ) चालक शिवराज देशमुख व माधव गंगाराम काळे रा. धानोरा हे दोघेही धानोरा येथून ढाणकीला येत असतानी अपघात झाला.

भरधाव वेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!