ताज्या बातम्यायवतमाळशहर

वृक्ष तोड व विक्री करणाऱ्या विरुद्ध तक्रार

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

यवतमाळ (दिनांक ४ जानेवारी) येथील प्रभाग २५ मधील कुंदन नगर मध्ये रोडच्या कडेला असलेले हिरव्यागार जिवंत पिंपळ वृक्ष अंदाजे २५ ते ३० वर्ष जुने दि. २९ डिसेंबर २०२४ रविवार राजी वृक्षतोड करण्यात आली व वाहतूक करून विक्री करण्यात आली.

कुंदन नगर मधील रहिवाशी मंगेश हजारे यांनी ही वृक्ष तोडीची माहिती वृक्ष प्रेमी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांना दिली.

विनोद दोंदल यांनी हजारे यांच्या कडून माहिती घेतली की हजारे यांनी नऊ महिन्यापूर्वी दि. ११ मार्च २०२४ ला नगरपरिषद व वनविभाग यांना लेखी स्वरूपात विनंती अर्जद्वारे कळवण्यात आले होते की सादर वृक्ष तोड करू नये.वृक्ष हे कोणाच्या मालकी हक्काच्या जागेवर नसून रोडच्या कडेला आहे.

वृक्षतोडीची व वाहतूक करून परस्पर विक्री करणाऱ्या विरुद्ध जेव्हा विनोद दोंदल हे निवेदन देण्यासाठी गेले असता संबंधित तेव्हा कर्मचाऱ्यांना विचारणा केली की वृक्षतोड का करण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांनी रीतसर परवानगी कडून वृक्षतोड केली आहे.

ऐकी कडे प्रशासन झाडे लावा झाडे जगवा संदेश देते तर नगरपरिषदेने रोडवरील वृक्ष तोडण्यास नाममात्र पावती फाडून परवानगी कशी दिली.

दिली तर तोडलेले वृक्षाचे लाकडे वाहतूक करून हजारो रुपयात विक्री कशी केली या संदर्भात विनोद दोंदल यांनी नगरपरिषद आणि वनविभागाला निवेदन देऊन संबधित वृक्षतोड करणाऱ्या व वाहतूक करून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर योग्य कारवाही करण्यात यावी.

अशी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांच्या कडून निवेदना देऊन मागणी करण्यात आले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!