ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

मानवत कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी कोमल सावरे आक्रमक पवित्रा

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (मानवत/परभणी प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत (दिनांक ७ फेब्रुवारी)आर्थिक वर्ष२०२४-२५ संपत आलेले असून वसुलीसाठी वरिष्ठ कार्यलया कडून वारंवार कर वसुली संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये शासनाने दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास शासन अनुदान बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने ०५ फेब्रुवारी रोजी मानवत नगर परिषदेची कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती दुकान भाडे, घरपट्टी, नळपट्टी, इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला.

२८ जानेवारी रोजी ज्या पद्धतीने कोमल सावरे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन गाळे भाडे थकबाकीदार यांच्या दुकानात सील ठोकले होते.त्याच प्रमाणे शहरातील वसुली रक्कम दहा हजार रुपये च्या वरती कर थकबाकीदारांची कुठलीही गय करण्यात येणार नाही असे निर्देश सर्व बिल कलेक्टर यांना मुख्याधिकारी यांच्या कडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.

शहरातील सर्व थक बाकीदारांना या पूर्वी सूचना देवून १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. तरी सुद्धा थक बाकीदार आपला कर भरणा करण्यास उदासीन दिसून येत आहेत, त्या मुळे नाईलाजास्तव ज्या थकबाकी दाराकडे दहा हजार रुपये पेक्षा जास्त थकबाकी आहे.

अशा सर्व थकबाकीदारांची यादी निश्चित करण्यासाठी बैठक घेण्यात आली. शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजेच मानवत बस स्थानक, मुख्य मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगरपरिषद कार्यालय इत्यादी ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेले थकबाकी लवकरात लवकर नगरपरिषद कार्यालयात भरून नगर परिषदेस सहकार्य करावे अन्यथा कार्यवाहीस सामोरे जावे १५ फेब्रुवारी नंतर थकबा कीदार यांच्या दारात ढोल ताशा लावून वसुली करण्यात येईल तसेच थकबा कीदार यांच्या पी. टी. आर. वरती शास्ती सह बोजा लावण्यात येईल.असे निर्देश मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिले आहेत.

नगर परिषदे मार्फत वसुलीसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली असून या मध्ये एकूण पाच पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

या बैठकीस नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी विभाग प्रमुख उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!