धारासुर येथील माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्सवाची कार्यकारिणी जाहीर

(अध्यक्षपदी दिक्षाताई शेळके; तर उपाध्यक्षपदी प्रियंकाताई मस्के यांची सर्वानुमते निवड)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (परभणी/मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238
गंगाखेड (दि. ३ फेब्रुवारी) तालुक्यातील मौ. धारासूर येथील त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड पंचायत समितीचा मा. सदस्या श्रीमती वंदनाताई राजेभाऊ गवळे या होत्या.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी धारासूर येथे त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती ०७ फेब्रुवारी रोजी उत्सहात साजरी करण्यात येणार असून या जयंती सोहळ्याची कार्यकारिणी निवडण्यात सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्षपदी श्रीमती दिक्षाताई शेळके यांची तर उपाध्यक्ष पदी प्रियंकाताई मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तर उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली यात सचिवपदी दिक्षाताई गवळे, कोषाध्यक्षपदी रमाताई गवळे सहसचिवपदी सरिताताई गवळे, सल्लागारपदी सीमाताई गवळे, लक्ष्मीबाई गवळे, दिवसावंतीबाई मस्के,रुक्मिणीबाई गवळे, द्रोपदाबाई शेळके, वृंदावनबाई जंगले यांची सर्वानूमते निवड करण्यात आली यावेळी बैठकीस धारासुर येथील धम्म उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात धम्म ध्वजाचे ध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल व त्रिशरण पंचशील ग्रहण करून प्रमुख मान्यवरांची मनोगत व्यक्त करण्यात येईल त्यानंतर त्याग मूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येईल.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
