आरोग्यउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

दूषित पाण्यामुळे विद्यार्थी सह हजारो लोकांचा जीव धोक्यात

(राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून लेंडी नाला बुजला)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सह संपादक) मो.9823995466

उमरखेड -राष्ट्रीय महामार्गाच्या कामात आंबवण तलावातून येणारा नाला कंत्राट दराने बुजविला. परिणामी या नाल्यालगतच्या तिन्ही विहिरीमध्ये घाण व सांडपाणी शिरत आहे त्यातूनच शाळेच्या विद्यार्थ्यांसह सात हजार नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.

शहरातून गेलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय ६६१ महामार्ग हा ढाणकी मार्गावरील बायपास रोडवरील उडान पुलाचे काम सुरू होते तेव्हा संबंधित कंत्राटदाराने आंबवन तलावातून येणारा नाला बुजवला होता. या नाल्यावर तीन विहिरी असून रूपाळा नागपूरच्या ग्रामपंचायत च्या सार्वजनिक विहिरीसह गावंडे कॉलेज व एमआयडीसीची अशा तीन विहिरी आहेत.

सध्या या विहिरीत घाण सडलेले दूषित पाणी शिरत आहे.त्यामुळे जवळपास १० हजार लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग निर्माण झाला असून साथीचे आजार पसरण्याची भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाचा संबंधित यंत्रणेला बुजवलेल्या नाला खोदकाम करून सुरळीत करण्याचे तात्काळ आदेश द्यावे.

अशा आशयाचे निवेदन रूपाळा नागापूर ग्रामपंचायत ने एसडीओना ८ जानेवारीला निवेदन दिले. मात्र अजून कारवाई झाली नसल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ढानकी रोडवरील उमरखेड बायपास उडान पुलाजवळील पूर्व बाजूने असलेल्या लेंडी नाला कंत्राटदाराने बुजविला होता.

या नाल्यामध्ये येणारे शहरातील सांडपाणी रुपाळा – नागापूर ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक विहीर गावंडे कॉलेजच्या विहिरीसह एमआयडीसीच्या विहिरीत जात आहे.

गावंडे कॉलेजच्या जवळपास चार हजार विद्यार्थी सहित तीन हजार गावकऱ्यांच्या पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरिया, कॉलरा,टायफाईड असे साथीचे आजार पसरण्याची गावकऱ्याकडून भीती व्यक्त होत आहे.

चौकट:- दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक पुरुष स्त्रिया शाळेतील विद्यार्थी, यांचे आरोग्य बिघडत आहे.तरी गावातील ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर यावर मार्ग काढावा..!

अन्यथा गावकऱ्यांना घेऊन पंचायत समिती उमरखेड येथे मोर्चा काढू, असा इशारा रूपाळा नागपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष, सुनील खोलगाडगे यांनी दिला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!