उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

स.अभियंता कांबळे यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून माझ्या झाडावर जिवंत विद्युत तार बांधून ठेवले – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना)

(अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित यवतमाळ यांना लेखी तक्रार सदर)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड:- (दिनांक 1 फेब्रुवारी) येथील विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री. काबंळे व त्याचे सहकारी यानी अर्थिक देवान घेवान करून दुसऱ्याच्या घरावरचा विज वाहीन्या माझ्या घरातील झाडाला अनेक महिन्यापासून बांधल्या असून ती काढण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे यांची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी असे तक्रार निवेदनात म्हटले आहे.

उमरखेड येथील विज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. कांबळे व त्याचे सहकारी यांनी इंदिरा नगरातील जिवंत विज वाहिन्या माझ्या घराजवळील झाडाला बांधून ठेवल्या आहेत. या वाहिन्याला नागरिकांचा स्पर्श झाल्यास जिवितहानी व इतर काही दुर्घटना घडल्यास यवतमाळ, सहाय्यक अभियंता, व उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी उमरखेड हेच जबरदार राहीतील.

तसेच या अगोदर कार्यालयामध्ये कार्यालयीन बुकावर तक्रार नोंद रितसर करून सुध्दा जिवंत विज वाहीण्या आजपर्यंत काढल्या नाहीत. तेव्हा सदर प्रकरणी चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी.

अशी तक्रार अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित यवतमाळ यांना लेखी तक्रार भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी दाखल केली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!