यवतमाळ येथील वाहुल दोंदल याने पटकावला यवतमाळ गॉट टॅलेंट २०२५ – २६ मध्ये प्रथम क्रमांक
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

यवतमाळ- उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दौदल यांचा मुलगा वाहुल (शुश्रूराजे) वय अवघे ८ वर्ष विश्वभारती विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाहुल याने दि. १२ फेब्रुवारी ला जाजू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ६ ते ९ च्या खलील बयोगटात यवतमाळ जिल्हा गॉट टेलेंट २५ – २०२६ मध्ये सहभागी होऊन आपले टॅलेंट दाखवले, निवड प्रक्रियेत वाहुलची निवड झाली होती, शनिवार दि.१४ फेब्रुवारीला त्याचे (grand Finale) फायनल झाले, वाहुल ने गुप “ब” मध्ये ६ ते ९ च्या खलील वयोगटात वाहुल ने महाराष्ट्राचे आराध्यदैवत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची छावा चित्रपटातील भूमिका साकार करून शिवकालीन मर्दानी खेळ लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा व आगेचीकाठी इत्यादी कला कौशल्याचे प्रयोग दाखवून अनेक जिल्ह्यातील अनेक शाळेतील मुलान मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, आपल्या कलेचे प्रदर्शन करून उपस्थित परीक्षक, पालकांना तसेच सर्व प्रेक्षकांना छत्रपती संभाजीराजांनी यांनी मोघलांच्या विरुद्ध केलेल्या युद्ध कलेचा विचारात भारावून टाकले.


वाहुल (शुभ्रूराजे) विनोद दोंदल याने मिळवलेल्या यशा बद्दल अथक प्ररिश्रम घेणारे खरे शिल्पकार त्याचे वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल, बहीण काश्यपी दोंदल, आजी कमळ दोंदल विशेष आभार विजयाचे शिल्पकार प्रशिक्षक प्रीतम सर सोनवणे यांचे आहे,

त्याच बरोबर भाऊ संस्कार दोंदल, शौर्य दोंदल, शिक्षण घेत असलेल्या विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका दीप्ती मॅम देशमुख, शाळेचे सचिव, भारमल मॅडम, वर्गशिक्षिका वैष्णवी शिंदे, प्रिया पाटील मॅम, क्रीडा शिक्षक अमोल जयसिंगपूर, आकाश खंदार सर, सोनू गावंडे मॅडम, हजारे सर सर्व शिक्षक वृंद इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शन करीन सहकार्य करीत राहतात, वाहुल सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व सवंगडी मुले-मुली सहकार्य करत असतात, वाहुल याने मिळवलेल्या नाविन्यपूर्ण मिळवलेल्या यशा बद्दल वाहुल (शुभ्रूराजे) विनोद दोंदल यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


