सावळी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238
मानवत (दिनांक ३१ जानेवारी )मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक ३० जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

विदयार्थ्यांना शिक्षणा बरोबरच त्यांच्यातील कला गुणांना ही वाव मिळावा या उद्देशाने दर वर्षी शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या वर्षी ही स्नेह संमेनाचे आयोजन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मा. मुख्याध्यापक रतन भुजबळ हे होते कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक म्हणून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिधदेश्वर भीमराव काळे, सावळी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती अनुजाताई माणिकराव काळे उपस्थित होत्या.

यावेळी विदयार्थ्यांनी देशभक्ती पर गीत, आनंदी गीत, सिनेमा गीत, व विविध नाट्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव इककर, विजय जल्हारे, चव्हाण सर, गंगाधर परदेशी, आशिष सर अंगणवा डीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुचिता कार्ले व शिंदे मॅडम यांनी केले

तर आभार श्री. विठ्ठल निलपत्रेवार यांनी मानले कार्यक्रमास विदयार्थ्यांचे माता पालक तसेच राजकीय मंडळी व जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
