ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

पंचशील नगर येथील त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर

(जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी यश लोखंडे ; तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ हनवते यांची निवड)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (परभणी/मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक २० जानेवारी)परभणी येथील पंचशील नगर येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी ०७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती उत्सहात साजरी करण्यात येणार असून या संदर्भात पंचशील नगर येथे १९ जानेवारी रोजी महत्वाची बैठक पार पडली.

यावेळी जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पंचशील नगर येथील त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचा अध्यक्षपदी यशभैया लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थभाऊ हनवते, सचिवपदी स्वप्निल भैया वाव्हळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तर उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली सहसचिव पदी विशालभाऊ घाटगीळे, कोषाध्यक्षपदी सम्यकभैया मोरे, सहकोषाध्यक्षपदी विशाल भैया किर्तने, कार्याध्यक्षपदी कैलास भाऊ पतंगे, संघटकपदी उत्कर्ष भैया लाटे, ऋतुराज भैया कांबळे यांची निवड करण्यात आली

तर मुख्यमार्गदर्शक म्हणून गणेशभाऊ गाढे, मिलिंददादा खरात, रत्नदीपभैया भालेराव सचिनभैया शेळके, रमेशभाऊ लोखंडे, हर्षवर्धनभैया मस्के, शैलेश भाऊ झोडपे, आकाशदादा वाळवंटे, अश्विनभैया मोरे, महेंद्रभाऊ पवार, जयपालभाऊ सोनटक्के चंद्रकांतभाऊ गाढे, हे राहणार आहेत यावेळी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ गाढे यांच्या सह उपस्थित समाज बांधवांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!