ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक
पार्थ पांडुरंग जाधव हा विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत उत्तीर्ण..!

(यशा बद्दल विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन)
मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे

मानवत तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा ईरळद येथील विद्यार्थी पार्थ पांडुरंग जाधव याने जवाहर नवोदय विद्यालय परिक्षा उत्तीर्ण होऊन जवाहर नवोदय विद्यालय परभणी प्रवेशासाठी निवड झाली आहे.

या यशा बद्दल पार्थचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, पार्थला ईरळद येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिंगाबर भिसे वर्गशिक्षक श्री. सुरेश कापसे, ट्युशन क्लासेसच्या शिक्षिका श्रीमती. श्रध्दा मोकरे, शिक्षिका श्रीमती. शारदा गजमल, नामदेव खिळदकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशा बद्दल पार्थला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
