जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते खरबा गावचे पोलीस पाटील सिद्धार्थ सुरवसे यांचा सन्मान
मानवत / प्रविण घागरे.
मानवत :- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्र सिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक गावात गावाच्या सुरक्षितेसाठी सि. सि. टीव्ही. कॅमेरे असावेत या उद्दिष्टातून मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरबा गावात पोलीस पाटील सिद्धार्थ सुरवसे यांनी सी. सी. टी. व्ही कॅमेरे बसवले.

या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मानवत पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी साठी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री रविंद्र सिंह परदेशी हे आले असता त्यांनी खरबा गावचे पोलीस पाटील सिद्धार्थ सुरवसे यांचा प्रसस्ती पत्र देऊन प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.


यावेळी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या सह पोलीस अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील पोलीस पाटील बांधव व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
