रानडूकराच्या हल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी

[झरी येथील २७ वर्षीय नितीन सत्वधर जखमी]
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ११ जानेवारी) तालुक्यातील मौ. झरी येथील शेतकरी शेतात ऊस पिकास पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी मानवत तालुक्यातील मौ. झरी येथील शेतकरी नितीन जगन्नाथ सत्वधर वय वर्षे २७ हे आपल्या शेतात १० जानेवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ऊस पिकास पाणी देण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने हल्ला केला या हल्ल्यात नितीन जगन्नाथ सत्वधर यांच्या डाव्या हातास चावा घेतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे.

सदरील घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मानवत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रानडुकराने शेतकऱ्याच्या हाताला मोठा चावा घेतल्यामुळे ते मोठया प्रमाणात जखमी झाले आहेत.

पुढील उपचारासाठी त्याना परभणी येथिल रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे झरी शिवारातील शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरले आहे.
