ताज्या बातम्यापरभणीमानवतराजकियशहर

मानवत येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्ष संपर्क कार्यालयाचे उदघाटन

[मा.आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते उदघाटन]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक १० जानेवारी) मानवत येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्ष तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन १० जानेवारी रोजी करण्यात आले. कॉ. कुमार शिराळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मा. क. प च्या मानवत तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाट्न मा. आ. सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न झाले.

यावेळी उदघाट्न प्रसंगी मा. आमदार सुरेशरावजी वरपुडकर म्हणाले की मि ही स्वतः पहिली जिल्हा परिषद निवडणूक शे. का. प. (लालबावटा ) च्या वतीने लढलो आहे,

तसेच स्थापन केलेल्या संपर्क तालुका कार्यालयामार्फत तालुक्यातील तमाम गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगा रांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा वक्त करतो असे ही यावेळी ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी कॉ. रामराजे महाडिक होते.

यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. उद्धवजी पौळ, शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) मानवत तालुकाध्यक्ष माणिकराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे मानवत तालुकाध्यक्ष संतोषराव मदनराव लाडाणे, वकिल सेल परभणी राष्ट्रवादी शरदचद्र पवार गटाचे ॲड. सुनील जाधव, कॉ. रामकृष्ण शेरे पाटील, कॉ. दिपक लिपने, बळीराम वराडे, (AIAWU) चे राज्यध्यक्ष कॉ. मारोती खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी संघटनेचे राजेभाउ काकडे, शिवसेना ठाकरे गटाचे मानवत शहर प्रमुख अनिल जाधव, ॲड. विक्रम दहे, अनंत भदर्गे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच महिलाच्या वतीने कॉ. इंदूताई महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कॉ. रामराजे महाडिक जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक बुरखुडें, कॉ लिंबाजी धनले, कॉ. कुंडलिक थिटे, कॉ. सिंधुताई धुमाळ यांनी पुढाकार घेतला.

यावेळी कलुबाई काळे, राधाबाई काळे , कविता काळे, ज्योती वैराळ, यांच्या सह संतोष मगर, राणबा कांबळे व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!