उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित चा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही – डी.के.दामोदर (जिल्हा महासचिव)
उमरखेड


(वंचित च अधिकृत उमेदवार तातेराव हनवते यांनी कुठलाही विड्रॉल किंवा माघार घेतलेली नाही)
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518
✍️सिद्धार्थ दिवेकर ( सह संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 19 नोव्हेंबर) उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदान बंधु भगिनींना जाहिर आव्हान करण्यात आहे की, वंचित बहुजन अधिकृत उमेदवार तातेराव मारुती हनवते यांनी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र स्टॅम्प पेपरवर समाज माध्यमावर आणि सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. वंचित बहुजन आघाडी उमरखेड महागाव विधानसभा याचा जाहीर निषेध करतो.

वंचित बहुजन आघाडीचा अजिबात पाठिंबा नसून समस्त मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी पाठिंबा देणे बाबत कोणतेही परवानगी दिली नाही.करिता आज पत्रकार परिषद घेऊन सर्व जनतेस करण्यात येत आहे.

असे जाहीर आव्हान डि.के. दामोदर जिल्हा महासचिव यवतमाळ यांनी या ठिकाणी केले आहे.यावेळी लक्ष्मण जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष), संबोधी गायकवाड (तालुकाध्यक्ष उमरखेड) प्रल्हाद नवसागरे (तालुका अध्यक्ष महागाव) वंदना भवरे (जिल्हा उपाध्यक्ष), विश्वास धुळे (उपाध्यक्ष) एस. के. मुनेश्वर (तालुका महासचिव) विजय लहाने (जिल्हा महासचिव) यांच्यासह अनेक उमरखेड व महागाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


