कामातून ठसा उमटविल्यास पुरस्कार मिळतोच – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावाड


✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238
मानवत (दिनांक १ फेब्रुवारी) प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून ठसा उमटविल्यास पुरस्कार मिळतोच त्यामुळे प्रत्येकानी आपापले कामे जबाबदारीने पार पाडून त्यातून ठसा उमटवावा व याहूनही मोठे पुरस्कार प्राप्त करावे असे प्रतिपादन मानवत ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावाड यांनी केले.

मानवत ग्रामीण रुग्णालयाला २०२३ – २०२४ मध्ये कायाकल्प योजनेअंतर्गत द्वितीय पारितोषिक मिळाले.या पारितोष काच्या स्वरूपात रुग्णाल याला एक लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.याच अनुषंगाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिक हुसेन यांच्या मार्गदर्शना खाली सर्व कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परभणी सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावाड हे होते तररुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक व शंकर कच्छवे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितताच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून करण्यात आले.यानंतर उपस्थित साधारणतः ५७ कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिक हुसेन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावाड यांनी मनोगत व्यक्त केली. पुढे बोलताना डॉ. नागेश लखमावाड म्हणाले की अजून या पेक्षाही मोठ्या पुरस्काराची गवसणी आपण घालावी. त्यासाठी आपल्या कामाच्या व्यापकता वाढवावी तसेच आरोग्य सेवा ही रुग्णांना शंभर टक्के द्यावी.

यातूनच आपल्या कामाची चुणूक दिसून येते. त्यामुळे सर्वांनी आपापली कामे जबाबदारीने पार पाडावी व राज्यस्तरावरील पुरस्कार आपणास मिळावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात कार्यालयीन अधिक्षक संजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिल शेख, डॉ.सुषमा भदर्गे , डॉ. गजदत्त चव्हाण, डॉ.ललीत कोकरे , डॉ. प्रिति दिक्षित वैद्यकीय अधिकारी (आर.बी. एस.के.) डॉ. कलिम खॉन – वैद्यकीय अधिकारी (युनानी)
शितल गायकवाड, मिनाक्षी कदम – (औषध निर्माण अधिकारी) शिला पाटिल (परिसेविका) शुभांगी जोशी , रेखा फुलमोगरे , शिवप्रिया सोगे, लक्ष्मी सोनवणे, योगीता म्हेत्रे , श्वेता धिवर, प्रज्ञा जगझाप, हिना शेख मुसा, बालिका सुरवसे, करुणा ढेपे, कपिल भरड,

सुनिल खरात, रेणुका देशमुख, दिक्षा गायकवाड, निशा वाकडे, एस. ए. खाँन, अकबर खान पठाण, नरेंद्र कचरु टोणपे, शोभा भगवानसिंग राजपुत, विठ्ठल धोपटे, महादेव पोटे, कपिल सोनटक्के, विष्णु टेकाडे, मोहन रासवे, शुभम करवलकर, दिपक कुमावत , सुमित लाड, मोहन कागडा , राजेश चिंडाले, बजरंग ढवळे शेख अब्रार गणेश गरड या कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
