उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

गो.सी.गावंडे महाविद्यालय येथे “सन्मान चौथ्या स्तंभाचा” व आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा..!

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 30 एप्रिल) गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय येथे “सन्मान चौथ्या स्तंभाचा” व आत्मदर्पण विशेषांक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.

या अध्यक्ष डॉ.या.मा. राऊत (सचिव अखिल कुणबी समाज संस्था यवतमाळ) हे होते,

तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुभाष सोनुने (विभागीय संचालक य.च.म. मु. वि. नाशिक,अमरावती), सखाराम मुळे (उपविभागीय अधिकारी उमरखेड), प्राध्यापक डॉ.दयाराम पवार (शिक्षण शास्त्र विद्या शाखा य. च. म. मु वि.नाशिक), शंकर पांचाळ (पोलीस निरीक्षक उमरखेड), राम देवसरकर (अध्यक्ष अखिल कुणबी समाज संस्था जिल्हा यवतमाळ), प्राचार्य डॉ. एम.बी. कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

इत्यादी प्रमुख पाहुण्यांनी आपापली मते पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकाराबद्दल सविस्तरपणे मांडली.

त्याच बरोबर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते उमरखेड शहर व तालुक्यातील दर्पण पत्रकार संघ,उमरखेड प्रेस क्लब, सयुक्त पत्रकार संघ, महात्मा ज्योतिबा फुले पत्रकार संघ, दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ इत्यादी पत्रकार संघांच्या अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष व सदस्य तसेच पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना भारतीय संविधान व पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शहर व तालुक्यातील तमाम पत्रकार बंधू तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाभसेटवार सर यांनी केले होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!