परभणी येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद संपन्न
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✒️प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी)
परभणी:- येथे २५ डिसेंबर बुधवार रोजी वंचित बहुजन महीला आघाडीच्या वतीने जनप्रीय कॉलनी कारेगाव रोड, उघडा महादेव परिसर, परभणी येथे दुपारी ०१ वाजता मनुस्मृती दहन दिना निमित्त भारतीय स्त्रीमुक्तीदिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले त्यानंतर शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहिद विजय वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे उभेराहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, शिवाजीराव वाकळे, जिल्हा महासचिव, शुधोधन सावंत, निरीक्षक लातूर, युवा जिल्हाध्यक्ष परभणी (दक्षिण) तुषार गायकवाड, महीला तालुकाध्यक्ष गंगाखेड अश्विनी मूजमुले यांची भाषणे झाली.

कार्यक्रमात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाताई सोमवंशी यांचा सन्मान करण्यात आला आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 15 व 16 मधील तरुणांचा पक्ष प्रवेश झाला.

शेवटी महीला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे यांच्या अध्यक्षीय समारोपाने परिषद संपन्न झाली.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव परभणी (उत्तर) महिला जिल्हा उपाध्यक्ष छायाताई खरात, जिल्हाउपाध्यक्ष ॲड. प्रतिमा चंद्रमोरे सुंदराबाई वाकळे महिला जिल्हा संघटक मंदाकिनी राठोड, महीला तालुकाध्यक्ष (मानवत) वंदना खिल्लारे, महिला शहर महासचिव, साधना हतागळे, महिला शहर उपाध्यक्ष, रेखा पंडित, सरुबाई कांबळे, अशोक वायवळ, संदीप खाडे, यशवंत सोनवणे, अमोल वाघमारे, सिद्धार्थ रायबोले, लहुजी केदारे यांची उपस्थिती होती.

परिषदेचे सूत्रसंचालन ॲड. सीमा भुतकर महिला तालुकाध्यक्ष जिंतूर यांनी केले तर माला साळवे महिला महासचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन सविता सोनटक्के जिल्हा सचिव यांनी केले.

या परिषदेला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
