डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गृहमंत्री अमित शाहा यांच्या अवमानजनक वक्तव्याचा मानवत येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध…!
मानवत

[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानवत तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन]
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपाद) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक २३ डिसेंबर)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत राज्य सभेत अत्यन्त अवमानकारक केलेल्या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मानवत येथे २३ डिसेंबर रोजी जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी मानवत तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन सादर करण्यात आले भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अवमानकारक भाष्य केल्या मुळे देशभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तमाम संविधान प्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य घटनाबाह्य आहे देशाचा राज्यकारभार हा भारतीय संविधानानुसार चालतो देशात लोकशाही व धर्मनिरपेक्षता हि संविधानामुळे अबाधित आहे.
संविधान हे भारतीय लोकांना अर्पण आहे त्या मुळे त्या संविधानावर व त्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व देशातील धर्म निरपेक्ष जनता कधीच सहन करणार नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्री यांनी तात्काळ माफी मागुन गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.

अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी निवेदनावर कॉ. रामराजे महाडिक, कॉ. रामकृष्ण शेरे पाटील, कॉ. अशोक बुरखुडें, अनिल जाधव मानवत शहर प्रमुख शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कॉ. लिंबाजी धनले, कॉ. अशोक कदम, कॉ. देविदास शिंदे, कॉ. डिगाबर गिरी, मुंजाजी सोनटक्के, लक्ष्मणराव भिसे, सखाराम जाधव, नाथा तुपसमुद्रे मारोती जाधव, दिपक ठेंगे यांच्या सह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
