कधी आमदाराच्या तर कधी आमदाराच्या पी. ए. च्या नावाने फोन करून शिक्षणाधिकाऱ्यावर दबाव
शैक्षणिक अपराध

[मानवत येथील निलंबित शिक्षकाचा प्रताप ; शिक्षकावर मानवत पोलिसांत गुन्हा दाखल]
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✒️ प्रवीण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.+918308755238
मानवत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शब्द वापरून मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्यामुळे त्या शिक्षकास निलंबीत करण्यात आले होते.

परंतु शिक्षक हा एवढ्यावरच न थांबता त्याने शिक्षणाधिकारी यांना आमदाराच्या नावाने व कधी पी. ए. च्या नावाने फोन करून दिशाभूल करत चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकला या प्रकरणी मानवत पोलीसांत त्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता होगे हा शिक्षक निलंबित झाला आहे त्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना फोन करुन मी आमदार बोलतोय तर कधी आमदाराचा पी. ए. बोलतोय असे म्हणत चुकीचे काम कारण्यास दबाव टाकला या प्रकरणी सुनील पोलास यांनी फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, जुन २०२४ पासुन कर्तव्यावर असताना माझ्या मोबाइलवर ७०८३४०५२४८ या क्रमांका वरुन वांरवार फोन येत होते.

मी शिक्षक आमदार बोलतोय, अथवा त्यांचा पीए. बोलतो असे ते म्हणाले व जिल्हा परिषद शिक्षिका मुंसाडे यांची प्रति नियुक्तीची फाईल तात्काळ सी. ई. ओं कडे पाठवा असे म्हणाले यावरुन मी त्यांना प्रति नियुक्तीचे अधिकार मला नाहीत असे म्हणालो तेंव्हा ते मोबाईल धारक मला या फाईल संदर्भाने माझे सी. ई. ओ. शी बोलणे झाले तुम्ही ती फाईल त्यांच्या कार्यालयात दाखल करा असे म्हणाले मी ती फाईल सी. ई ओं. च्या कार्यालयात दाखल केली होती.

नंतर परत मला मोबाईल क्रंमाक ७५०७०९०३३३ वरुन शिक्षक आमदार यांच्या नावाने फोन आला व ते मला येथील झेडपी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदाचा कार्यभार छाया गायकवाड यांच्याऐवजी ईतराना देण्यासाठी धमकीवजा भाषेत बोलले तसेच माध्यमिक शिक्षकांचे समायो जनबाबतीत ही फोन करुन मी एल. ए.क्यू करेल असे म्हणुन दबाव टाकत होते.

मुंसाडे शिक्षिकांबाबत सीईओंशी बोललो तुम्ही त्यांची फाईल घेऊन जा, फाईलवर सही झाली ती घेऊन या असे वांरवार बोलत होते यानंतर मी फाईल घेण्यासाठी सीईओंच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता त्या फाईल संदर्भात कार्यालयात कोणताही विषय उपस्थित नव्हता.
यावरुन हा इसम माझी विनाकारण दिशाभूल करत होता १८ ऑक्टोबर रोजी मला शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांचा फोन आला व ते म्हणाले माझ्या फोनवर परभणीचे आमदार यांचा फोन आला व त्यात ते दता होगे यांच्यावर दाखल गुन्हयासंदर्भात बोलत होते ते होगे यांना मुख्याध्यापिका गायकवाड यांनी कट रचून अडकवले.

या संदर्भात चौकशी करुन वस्तुस्थितीचा शोध घ्या याची मला शंका आल्याने मी त्यांना श्री. वरपुडकर यांचा फोन आलेला मोबाईल नंबर व्हाट्स व्हाट्सअप पाठविण्याची विंनती केली असता त्यांनी मला तो पाठवला असता तो ७५०७०९०३३३ होता तोच नंबर माझ्याकडे कपील पाटील नावाने आलेला होता.

या प्रकरणी शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांच्या फिर्यादीवरून निलंबित शिक्षक दत्ता होगे यांच्या विरुद्ध मानवत पोलिसांत भारतीय न्याय संहिता ( बि.एन.एस) चे कलम २२१, ३१९, ३५१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापास मानवत पोलीस करत आहेत.
