उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

रिदम कराओके क्लब अकॅडमीतर्फे भीम गीतांचा मळा फुलला; सुरांच्या वर्षावात महामानवाला अभिवादन

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरखेड येथील ‘रिदम कराओके क्लब अकॅडमी’ च्या वतीने दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी एका भव्य आणि जल्लोषक संगीतमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सादर झालेल्या भीम गीतांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आणि कौतुक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा. अनिल काळबांडे, प्रेम हनवते आणि प्रा. तायडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून रिदम क्लबच्या सामाजिक व कलात्मक उपक्रमांचे आणि संचालक संजय मुटकुळे सरांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विद्वान केवटे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परीक्षकांकडून कलाकारांची पाठराखण या गायन सोहळ्यासाठी परीक्षक पी. डी. शिंदे सर आणि सा वळकर सर यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली. त्यांनी प्रत्येक गीताचे तांत्रिक बारकावे टिपून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचे विशेष अभिनंदन केले. हृदयस्पर्शी ‘रमाई’ गीताने डोळे पाणावले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संजय मुटकुळे सर यांनी स्वतः लिहिलेले आणि गायलेले ‘रमाई’ वरील हृदयस्पर्शी गीत. हे गीत ऐकून सभागृहातील रसिक भावूक झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.कलाकारांच्या सुरांनी सजली सायंकाळ रिदम क्लबच्या अनेक दिग्गज गायकांनी आपल्या पहाडी आवाजात भीम गीते सादर केली. यात प्रामुख्याने खालील कलाकारांचा सहभाग होता.

बीचेवार सर: (छाती ठोकून)चक्रधर फटाले: (भीम गीत)संजय गंगात्रे: (आज से पहिले)मनीष भट्टड: (किती शोभला असता…)सुरेश वाघ: (भीम गीत)अविनाश निलावार: (मनाच्या धुंदीत)अर्शद भाई: (भीम गीत)मनीषा बिचेवार: (भीम गीत)दीपक शहाणे: (पहिले माझे वंदन माझ्या बा भीमाला)शारदा वानोळे ताई: (माझ्या भिमाच कुंकू लावते)वर्षां अनखुळे: (रमाई शिकली बाराखडी)राजू सावतकर: (लय बळ आलं)मलकेवार टेलर: (भीम गीत)ज्योती वाठोरे ताई: (बोलते आज वातावरण)सुरेश राठोड: (हे पाणी आणिले मी.), डहाके सर: (आ चल के तुझे) तायडे सर: (माऊली ची माया)गजानन लंके पिल्लेवार: (भीम गीत) कालींदे मॅडम: (भीम गीत)डॉ. दीपक ढोक (जीवाला जीवाच दान दिलं भीमाने)आनंद बाबा शिंदे (गरीबी जरी त्या संसारात – स्वर व लेखन) नेटके नियोजन आणि आभारया संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी आयोजन चित्रपट लेखक-दिग्दर्शक आनंद शिंदे बाबा, श्री. मनीष भाऊ, तायडे सर व रिदम क्लबच्या सर्व सदस्यांनी केले.

विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित सर्व मान्यवरांनी रिदम क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!