आरोग्यउमरखेडमहाराष्ट्रशहर

उमरखेड येथे एकल वापर प्लास्टिक बंदी; अनेक दुकानदारांना हजारो रुपयांचा दंड

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक)

उमरखेड :- (दिनांक १६ डिसेंबर) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ५.० अंतर्गत गुरुवार दि.१२/१२/२०२४ रोजी एकल वापर प्लास्टिक बंदी बाबत उमरखेड नगरपरिषद उमरखेड जि. यवतमाळ यांच्या तर्फे जनजागृती करण्यात आली. उमरखेड येथे एकल वापर प्लास्टिक बंदी. अनेक व्यापारी दुकानदारांना हजारो रुपयांचा दंड नगरपालिकेने ठोकला आहे.

भाजीपाला फळ विक्रेते यांचेकडील प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच त्यांना प्लास्टिक बंदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.एकूण 70 किलो प्लास्टिक व 36000 दंड लावण्यात आले. केंद्रशासनाच्या पर्यावरण वन व हवामान परिवर्तन मंत्रालयाद्वारे पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८० ला अनुसरून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६, अधिसूचीत करण्यात आले आहेत.

यामधील प्रथम सुधारणा नियम, दिनांक १२/०८/२०२१ अन्वये सन २०२२ पर्यंत Single Use Plastic वस्तूंना प्रतिबंधित करण्याकरिता ३० सप्टेंबर, २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र विघटनशील अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ ला अनुसरून महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) निगमन अधिसूचना दि. २३/०३/२०१८, दि. ११/०४/२०१८, दि. ३०/०६/२०१८ या तरतुदी अन्वये राज्यात विविध प्रकाराच्या प्लास्टिक वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे.

उपरोक्त नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे.

यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यास प्रथम गुन्हा– उल्लंघन दंडात्मक कार्यवाही ५०००/- रुपये, दूसरा गुन्हा – उल्लंघन १००००/- रुपये, तिसरा गुन्हा -उल्लंघन २५०००/- रुपये आणि ३ महिन्यांचा तुरुंगवास अशी कारवाई करणेत येईल.

तरी प्लास्टिक, थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री हाताळणी करण्यात येऊ नये आशा प्रकारे सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या.

सदर कार्यवाही उमरखेड नगरपरिषद मा. मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्लास्टिक बंदी पथक यांच्या अंतर्गत करण्यात आली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!