शिक्षक श्री. रमेश मुलगीर यांना आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक ०६ जानेवारी) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचा आदर्श कलाध्यापक पुरस्कार मानवत येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रमेश धोंडीबा मुलगीर यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व नंदुरबार जिल्हा कलाध्या पक संघाच्या विद्यमाने महाराष्ट्रातील कलाध्यापकांची ४३ वी कलाशिक्षण परिषद (अधिवेशन ) ११ व १२ जानेवारीला नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे होणार आहे.

या अधिवेशनात राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार श्री. रमेश मुलगीर यांना आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रा सह विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

