ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

✍️गणेश धनवडे (इंदापूर प्रतिनिधी)

कळंब ता.इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले.

यावेळी प्रा. महादेव माळवे,प्रा.विनायक शिंदे ,प्रा.राजलक्ष्मी रणसिंग,प्रा.सुमेधा रणसिंग,प्रा.काजल राजेभोसले,प्रा.आकांक्षा मेटकरी,प्रा.अपेक्षा मेटकरी,प्रा. प्राजक्ता पवार, प्रा.कोमल चव्हाण,प्रा.शितल शिरसट , प्रा.निकीता पांडव, श्रीमती रंजना दणाणे, तस्लीम शेख इ मान्यवर व सावित्रीच्या लेकीनी अभिवादन केले. उपप्राचार्य गुळीग यांनी सावित्रीबाई फुले यांचा विचारांचा वारसा जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

भारतातील स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात असूनसावित्रीबाई फुले यांनी पती ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने सन १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून भारतीय समाजात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात महिलांना शिक्षण देणे हे मोठे धाडस मानले जात होते, तरीही त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे लढा दिला.महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा आणि समानतेची भावना रुजावी यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. प्लेगच्या साथीच्या काळात रुग्णांची सेवा करताना १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असून शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचा संदेश त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना मिळत असल्याचे सांगितले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!