Uncategorized

सत्यशोधक शेतकरी संघातर्फे डॉ. प्रेम हनवते यांचे नामांकन दाखल

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 29 ऑक्टोंबर) उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामांकन भरले असून सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे डॉ. प्रेम हनवते यांनी श्रीहरी सुपर मार्केट येथून हजारोंच्या संख्येने वाजत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी,वसंतराव नाईक, जेठमलजी माहेश्वरी, नारायणराव वानखेडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रेम हनवते यांनी नामांकन दाखल केले.

यावेळी त्यांच्यासोबत सत्यशोधक शेतकरी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार संघातील उपयुक्त सोयी सुविधा, बेरोजगारीचा प्रश्न,उच्च शिक्षणाची संधी अशा मूलभूत सुविधा आणण्याचा मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दैनिक देशोन्नती प्रतिनिधीशी बोलताना प्रेम हनवते यांनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!