अवैधताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहर

रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडला

(पण मानवत पोलिसांची कारवाई)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०५ जानेवारी) मानवत तालुक्यातील रूढी खरबा शिवारात रेतीची वैध ०५ जानेवारी रोजी रेतीची अवैध चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक मानवत पोलिसांनी पकडला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी मानवत तालुक्यातील मौ. रूढी खरबा शिवारात रविवारी सकाळी ०८ च्या सुमारास मानवत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे, पो. हं. गायकवाड हे गस्तीवर असताना भारत बेझ कंपनीचा पिवळ्या रंगाचा हायवा ज्याचा चेसिस क्रमांक MEC841PP151046 असलेला

हायवा ज्याची किंमत १० लाख रुपये अंदाजे चार ब्रास वाळु (रेती) ज्याची किंमत १२ हजार रुपये असा एकूण १० लाख १२ हजार रुपये असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मालक मोसीन महेमूद शेख, वय ३४ वर्ष, रा. कुंभारी पिपळगाव ता. धनसांवगी जि. जालना याची चौकशी केली असता

तो अवैध रित्या गोदावरी नदीची रेती घेवुन ही चढ्या भावाने चोरटी विक्री करण्या च्या उद्देशाने आढळून आला सदरील प्रकरणी ०१/२०२५ चे कलम ३०३ (२) बि. एन. एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे करत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!