गावंडे महाविद्यालय रा.से.यो. मार्फत भव्य शोभायात्रा
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दि. २२ फेब्रुवारी) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दत्तक ग्राम मरसूळ, उमरखेड येथे आयोजित केले आहे.

आज शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मार्फत विशेष शिबिरादरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले शोभायात्रेसाठी उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा मरसुड येथील विद्यार्थी गावकरी व विविध संघटनेचे पदाधिकारी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, विनायक मारडकर शिव सैनिक व इतर सर्व कार्यकर्ते व शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

दुपारच्या बौद्धिक क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, स्वच्छ भारत व पर्यावरण या विषयावर चर्चासत्र होणार आहे. बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट निरंजन कदम व प्रमुख पाहुणे पोलीस पाटील श्री उत्तम बनसोड, श्री बंडू पाटील कदम, तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, किसनराव पुरी, जेस्ट नागरिक, लक्ष्मण बेंडके श्री. सुभाष स. भालेराव, मुख्याध्यापक, श्री दिलीप जाधव पदवीधर शिक्षक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन रोहन राठोड, अंजली जाधाव, स्वागत गीत अचल शींदे व आभार प्रदर्शन सानिका जधाव यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी कार्यक्रमात भरभरून सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून सर्व कार्यक्रमांची आखणी केल्या गेली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, अर्चना मीटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
