ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने च्या प्रशिक्षणार्थीचा कार्य काळ वाढवुन त्यांना नियुक्ती द्यावी.

[मानवत तालुक्यातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीची मागणी]

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (परभणी/मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत दिनांक ०७ फेब्रुवारी)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने च्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढवुन त्यांना नियुक्ती द्यावी अशी मागणी मानवत तालुक्यातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीनी मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आस्था पनेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणुन ०६ महिन्या करिता नियक्ती देण्यात आली होती. परंतु त्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे .

आस्थाप नेत असताना दिलेले काम प्रशिक्षणा र्थी व्यवस्थीतरित्या पार पाडत आहे असे निदर्शनास आहे तसेच वर्तणुक सुध्दा नम्रता पूर्वक असून शासनादेश मुद्दा क्रमांक ४.५ व कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्या नुसार आमच्या आस्थापनेत मनुष्य बळाच्या आवश्यकतेचा विचार करता, सदर प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवुन पुन्हा त्यांना नियुक्ती देऊन रुजु करण्यात यावे अशी मागणी.

यावेळी करण्यात आली असून यावेळी कुलदीप मनेरे, विकास शेळके, शरद ठेंगे, रामप्रसाद काळे, अशोक सौदागर, हनुमान शिंदे, लखन जाधव, पांडुरंग भोंडवे, यांच्या सह युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!