अपराधताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतविशेष

नागरिकांना ५० लाखाचा चुना लावणारा बांधकाम गुत्तेदार पोलिसांच्या ताब्यात

(११ जणांच्या बांधकामासाठी जमा केले होते ५१ लाख ५५ हजार रुपये)

✍🏻प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)

मानवत :- तालुक्यातील मंगरूळ पालमपट या गावातील एका व्यक्तीचे बांधकामाचे गुत्ते घेऊन व बांधकाम तसेच अर्धवट सोडून पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ नोव्हेंबर २०२४ ते १५ मे २०२५ चे दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मानवत तालुक्यातील विठ्ठल अंकुशराव निलवर्ण राहणार मंगरूळ (पा.प ) यांनी आपल्या घराचे बांधकाम काढले होते.

त्यांच्या ओळखीचे व्यंकट श्रीधरराव कुलकर्णी राहणार नरळद यांना बांधकाम बाबत चौकशी केली त्यांनी त्यांचे बांधकाम करत असलेले गुत्तेदार अमजद खान इब्राहिम खान रा. धार रोड परभणी यांना विठ्ठल निलवर्ण यांच्या राहत्या घरी घेऊन आले व त्यावेळी त्यांना बांधकामाची चौकशी करून त्यांना १३०० रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे बांधकाम देण्यात आले.

२९ नोव्हेंबर २०२४ रोजी मानवत येथील नोटरी धारक वकिलाकडून बांधकामाचा करारनामा नोटरी करून घेण्यात आला. यावेळी गुत्तेदार यांना बांधकामासाठी एकूण ३ लाख रुपये दिले होते. त्याचप्रमाणे बांधकाम सुरुवात झाल्यानंतर घराच्या पायाभरणी झाली. पायाभरणीनंतर त्यांना ०२ लाख रुपये देण्यात आले.

पैसे घेऊन गेल्यानंतर त्यांनी गुत्तेदारास वारंवार मजूर पाठवून काम पूर्ण करण्याबाबत तगादा लावला मजूर बांधकाम करण्यासाठी पाठवतो असे म्हणून सतत वेळ काढून नेल्या जात होती यावेळी त्यांचा भाऊ ऋषिकेश एकनाथ निलवर्ण याने सुद्धा त्यांच्या घराचे बांधकाम गुत्तेदार अमजद खान इब्राहिम खान यास दिले होते. त्याने एकूण ७ लाख रुपये बांधकाम करिता दिले होते त्यांचे ही बांधकाम अर्धवट सोडून सदर गुत्तेदार पळून गेला असुन गुत्तेदाराबद्दल त्यांनी माहिती काढल्यावर असं समजले की तालुक्यातील आटोळा, सोमठाणा व नरळद येथील साधारणतः सात ते आठ जणांचे पैसे घेऊन त्याने बांधकाम न करता पळून गेल्याचे दिसून आले त्यामध्ये विठ्ठल सखाराम करडले रा. आटोळा १ लाख ६५ हजार रुपये, सिताराम विठोबा करडले रा. आटोळा ७ लाख रुपये , दत्ता सखाराम करडले रा. आटोळा ४ लाख ५० हजार रुपये , पार्वतीबाई उद्धवराव बारहाते रा. नरळद ४ लाख ५० हजार रुपये , पांडुरंग यादवराव निर्वळ रा. नरळद ७ लाख २५ हजार रुपये , व्यंकटराव श्रीधरराव कुलकर्णी रा. नरळद ५ लाख २५ हजार रुपये , संतोष माणिकराव मुळे रा. सोमठाणा २ लाख ५० हजार रुपये , रामकिशन मुंजाजी निर्वळ रा. सोमठाणा ७ लाख रुपये व श्रीकिशन आबासाहेब निर्वळ रा. सोमठाणा २ लाख ९० हजार रुपये या लोकांचे एकूण ४२ लाख ५५ हजार रुपये एवढी रक्कम घेऊन बांधकाम अर्धवट ठेवून पळून जाऊन वरील लोकांची फसवणूक केली असुन या प्रकरणी विठ्ठल निलवर्ण यांचे फिर्यादीवरून मानवत पोलिसात भारतीय न्याय संहिता चे कलम ३१८ (४) व ३१८(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास मानवत पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहेत.

सदरील आरोपी अटकेत असून त्यास न्यालयात प्रस्तुत करण्यात आले त्यास ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (नागरिकांनी बांधकाम देताना सतर्कता बाळगावी – पो.नि.संदीप) बोरकर या घटनेच्या अनुषंगाने मानवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तालुक्यातील नागरिकांनी बांधकाम देताना बांधकाम गुत्तेदार व मजूर यांची ओळख पटवूनच बांधकाम द्यावे. एवढेच नव्हे तर शासनाने सध्या प्रत्येक कामगाराला शासनाकडून ओळखपत्र दिले आहे. शासकीय ओळखपत्र दाखवल्याशिवाय बांधकाम देऊ नये.

बांधकाम करते वेळेस कामगार व गुत्तेदार हे सरळ घरात वावरतात अशा वेळी कोणताही गैर प्रकार होऊ नये या साठी सतर्कता बाळगावी व अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!