उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहाला दारूचा अड्डा बनवणाऱ्या संबंधित अधिकारी व स्थानिकचे काही पत्रकार यांची तात्काळ चौकशी करून कारवाई – भीम टायगर सेना

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक)
उमरखेड (दिनांक 7 जून) सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत सुरू असलेले शासकीय विश्रामगृहाला संबंधित विभागातील अभियंता व अधिकारी यांच्या संगणमताने या विश्रामगृहाला दारूचा अड्डा बनविण्याचे महान कार्य प्रगतीपथावर सुरू केले आहे. या विश्रामगृहात एवढ्यात पाहुण्यांची आवक जावत होत नाही. मग येथे हा दारू पिण्याचा कार्यक्रम कोण? करतो.


याची माहिती घेतली असता येथे दररोज दुपारी १२ वाजता पासून ते रात्री १२वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्थानिक चे काही पत्रकार हे बसून दारू पिण्याचा कार्यक्रम करीत असतात अशी माहिती आहे. हे ऐकून धक्काच बसला सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियंता व इतर अधिकारी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून गप्प का? आहेत.याप्रकरणी बातमी प्रकाशित होऊ नाही सा.बां उप कार्यालयाकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत.याचा अर्थ असा होतो की, या पत्रकारांची या अधिकाऱ्यांवर असलेली दहशत समजावी का? हा प्रश्न नागरिकात चर्चिला जात आहे.

म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहाला दारूचा अड्डा बनविणाऱ्या संबंधित अधिकारी व पत्रकार यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

अशी रितसर तक्रार भिम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय शेंडे, जिल्ह्याचे नेते टोनूभाऊ मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर व तालुका कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी यवतमाळ जिल्हा अधिकारी व तसेच अधीक्षक अभियंता मंडल कार्यालय यवतमाळ यांनी दिली आहे.
