ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

मृख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा अभियानात तालुक्यात जनुना जिल्हा परिषद शाळा प्रथम !

तीन लाख रुपयांचे बक्षिस वितरण व पोरोतोषीक मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव; बिटरगाव (खु) व धनज द्वितीय व तुतीय; महात्मा ज्योतीबा फुले जिल्हयात प्रथम ११ लाख

उमरखेड :- (दिनांक ३० एप्रिल) तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा अभियान जे शिक्षण विभागानी राबविले त्यामध्ये तालुकयात जिल्हा परिषद व माध्य. शाळा जनुना या शाळेला प्रथम तालुकास्तरीय बक्षीस तीन लाख रुपयांचे व पोरोतोषीक मान्यवरांच्या हस्ते मिळाले.

दि २६ एप्रील २०२५ ला जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गुण गौरव सन्मान सोहळा झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. किसनराव वानखेडे व भाजपा समन्वयक नितिन भुतडा, गटशिक्षण अधिकारी सतिष दर्शनवाड , माजी आ. विजय खडसे माजी जि.प अध्यक्ष रमेशराव चव्हाण व माजी जि प सदस्य देविदास खोकले, मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, सरपंच सुनिता बुरकुले, माजी सरपंच राधाबाई ढाकरे, बळीराम चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष, सतिष राठोड, केंद्र प्रमुख चव्हाण मुख्याध्यापक विनायक मुळावकर यासह उपस्थित होते.

शासणानी दिलेल्या राज्य व केंद्र सुचविलेल्या सर्जनशील उपक्रम तसेच विविध सामाजीक शाळेनी उल्लेखनीय कार्य केले या उपक्रमाची दखल घेत पुरस्कार प्राप्त झाला या शाळेचे अभिनंदन व गुण गौरव बक्षीस वितरण करण्यात आले . केंद्रप्रमुख चव्हाण यांनी विचार मांडले मुख्याध्यापक विनायक मुळावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

जनुना शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवतेत आघाडी घेतली तसेच बौद्धीक विकासा बरोबर शारीरीक व माणसिक विकासा ला प्राधान देऊन स्पर्धेत विद्यार्थी सक्षम बनले त्याच धर्तीवर झेप डॉ बाबासाहेब आंबेडकर पायाभुत शिक्षणात क्रमांक पटकाविला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मध्ये तालुक्यात जनुना शाळेनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तीन लाख रुपयांचे मिळाले व द्वितीय बक्षीस दोन लाख बिटरगाव (खु) तुतीय बक्षीस एक लाख धनज यांना मिळाले.

महात्मा फुले शाळेला ११ लाख जिल्हयात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले नागपुर (प) यांना ११ लाख मिळाले जिल्ह्यातून मिळाले . जनुना शाळेनी पायाभुत शिक्षण गुणवतापूर्ण भौतिक सुविधा सुंदर शाळा पौष्टीक आहार विद्यार्थ्यांच्या गुणवतेची आघाडी व खेळ क्रिडा जिल्हया मधुन मुलीनी बाजी जिल्हयात बाजी मारली महादीप प्रकल्प मध्ये शाळा आघाडी विद्यार्थ्यांच्या कला गुणाणा वाव मिळवत स्नेह संमेलन सांस्कुतिक कार्यक्रम असे या शाळामधुन गुणवता घडली.

देविदास खोकले यांनी गावाच्या विकासाच्या समस्या मांडल्या व नितिन भुतडा यांनी गावाच्या पाच समस्या पूर्ण करण्याचे वचन दिले . गटशिक्षअधिकारी सतिष दर्शनवाड यांनी शाळेच्या गुणवतेवर विचार व्यक्त केले.

मा आ. विजय खडसे व रमेशराव चव्हाण यांनी शाळे च्या गुणवतेबदल बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ . वानखेडे यांनी सांगितले तालुक्यातून ७२ कलेक्टर शिक्षकांनी घडवावे मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले नौकरी केली आता मी आमदार म्हणुन तुम्ही सेवा करीत आहे.

शाळेच्या शिरपेचात मानाचा तूरा :- शैक्षणिक धोरण राबविताना तंतोतत पालन करता यावे यासाठी शाळा प्रयत्नशिल आहे शाळेची सुंदर इमारत वर्ग खोल्या बैठक व्यवस्थ शाळेच्या बोलक्या भिंती डिजीटल शाळा ग्रंथालय क्रिडांगण तंबाखूमुक्त प्लॉस्टीक मुक्त शालेय परिसर कचऱ्याचे व्यवस्थापन पटसंखा सर्वाधिक यावर शिरपेचात मानाचा तुरा रोवला त्यामुळे तालुक्यात जनुना जिल्हा परिषद शाळा प्रथम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविले.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शाळा केंद्रातील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक पालक समिती पदाधिकारी व ग्राम पंचायत सरपंच व सदस्य उपस्थीत होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!